बेळगाव : देहरादून - उत्तराखंड येथील मल्टीपर्पज हॉल परेड ग्राऊंड येथे झालेल्या चौथ्या कियो राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या इंडियन कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत इंडियन कराटे क्लबचे सहा कराटेपटू सहभागी झाले होते. तर संपूर्ण भारतातून एकूण दोन हजार हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील विद्यार्थिनी सरिता सोनार हिने सुवर्णपदक पटकावले तर अयान गोकाककर याने रौप्य पदक पटकावून बेळगावचा लौकिक वाढविला.

अनुश्री बेंबळगी , संस्कृती काकतकर, अथर्व सूर्यवंशी आणि सृष्टी बेळगावकर यांनी खेळाचे विशेष प्रदर्शन केले.
या विजेत्या कराटेपटूंना अखिल कर्नाटक स्पोर्टस् कराटे असोसिएशनचे सचिव भार्गव रेड्डी तसेच अध्यक्ष अरुण माचा यांचे प्रोत्साहन तर बेळगांव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, सचिव जितेंद्र काकतीकर व प्रशिक्षक परशुराम काकती, हरिष सोनार आणि निलेश गुरखा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.