खानापूर : 34 वर्षीय तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
अमर प्रेमानंद पाटील ( राहणार ईदलहोंड, तालुका खानापूर- बेळगाव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आज शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
अमर पाटील याने ईदलहोंड फाट्याजवळील आपल्या दुकानात स्वतःला गळफास लावून घेतला.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांचा मुलगा आणि तीन महिन्याचे बाळ असा परिवार आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
