LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अचानक विजखांबावर उडाल्या ठिणग्या, लागली घरांना आग, जळाली उपकरणे : रात्रीच्या या प्रकाराने उडाली एकच धावपळ

यादगीर : वीज पुरवठ्यात अचानक बिघाड होऊन ठिणग्या उडाल्या आणि या ठिणग्या घरांवर पडून घरांना आग लागली. या आगीत काही घरे तर काही घरातील विजेवर चालणारी उपकरणे जळून खाक झाली. सुमारे 100 घरांना याचा फटका बसला.


कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील जळीबेंची या छोट्या खेड्यात ही घटना घडली.


अचानक वीज पुरवठ्यात बिघाड झाला आणि मोठा गोंधळ उडाला. वीज खांबावर ठिणग्या उडाल्या, धूर निघाला आणि शॉर्टसर्किट होऊन घरातील विजेवर चालणारी उपकरणे जळू लागली. घरातील उपकरणे आणि वायर जळू लागल्याने घरातून धूर आणि काहीतरी जळल्याचा वास येऊ लागला. घाबरून लोक घराबाहेर पडले तो रस्त्यावरील वीज खांबावरून ठिणग्या पडत होत्या, धूर निघत होता. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गावात एकच धावपळ उडाली.


ठिणग्या पडून आणि शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या या आगीत सुमारे 100 घरांना फटका बसला तर बऱ्याच घरातील स्विच बोर्ड, बॅटऱ्या, पंख्याची पाती, टीव्ही, फ्रिज अशा अनेक उपकरणांचे नुकसान झाले. या घटनेत दोघेजण जखमी झाले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.


विजेच्या खांबांतून उडणारे स्पार्क्स, घरांच्या छपरांतून निघणारा धूर आणि घरांच्या आतल्या जळालेल्या वस्तूं असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.वादळी वाऱ्यांसह झालेल्या धुव्वाधार पावसामुळे जुने वीज तार एकमेकांना लागले असावेत आणि त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.


गुलबर्गा इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीचे (GESCOM) अधिकारी गावात पोहोचले असून, वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गावातील वीज वायरिंग खूपच जुने असून, काही लाईन अनेक दशकांपूर्वीच्या आहेत. त्यामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप करीत आता तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी गावातील लोकांतून गुलबर्गा इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीकडे होत आहे


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती