LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

डोंगरावरून अचानक कोसळले मोठे खडक : झाला वाहनांचा चुराडा

सौंदत्ती : बेकायदेशीर खाणकाम चालू असताना अचानकपणे डोंगरावरील मोठमोठे खडक कोसळू लागले आणि कोसळणाऱ्या त्या दगडाखाली आलेल्या वाहनांचा चुराडा झाला.
सौंदत्ती तालुक्यातील यड्रावी गावात बुधवारी रात्री सुमारे 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत एक जेसीबी आणि ट्रॅक्टर पूर्णपणे खराब झाले. खडकांच्या खाली काही मजूर अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीर खाणकाम सुरू असताना अचानकपणे डोंगरावरून मोठे खडक खाली कोसळले आणि एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच सौंदत्ती येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांना कोसळलेल्या खडकांखाली पूर्णतः चुरडलेली वाहने आढळून आली, मात्र खडकाखाली कोणी मजूर अडकले आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. रात्री अंधारामुळे शोधमोहीमेस अडथळा निर्माण झाला होता. सकाळी पुन्हा दगड हटवून शोधकार्य हाती घेण्यात आले होते.
गावात खाणकाम करणारे काहीजण बेपत्ता असल्याची चर्चा असल्याने खडकांखाली ते मजूर अडकले की काय ? अशी भिती व्यक्त होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती