बेळगाव, दिनांक 20 ( bn7news) : श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा गणेश उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
महिलांसाठी हळदी-कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सौ. प्रीती अभय पाटील, सौ. मीनाताई बेनके, सौ. प्रीती कामकर, सौ. शिल्पा हेतलकेरी, माधवी हिंडलगेकर, विजेता काकतीकर यासह या भागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजसेवक शितल पाटील , विनायक कामकर, मंडळाचे अध्यक्ष शंकर कांबळे, सुरेश वीरनगौडर उपस्थित होते.
तसेच कॉलनीतील लहान व मोठ्यासाठी नृत्य, गीत गायन, क्रिकेट, फुटबॉल, कॅरम, बुद्धिबळ, चित्रकला ईत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर, समाजसेवक दत्ता जाधव, चंद्रकांत कोंडूस्कर, विश्वनाथ येळ्ळूरकर उपस्थित होते.
श्री मंडपात सत्यनारायन पूजा घालण्यात आली होती. पूजेला यजमान म्हणून गजानन तुडवेकर आणि नम्रता तुडवेकर उपस्थित होते.
