LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शुभमुहूर्तावर शुभमंगल ...!!  खानापूर तालुक्यात नव्या आचारसंहितेत पार पडले लग्न

खानापूर : चन्नेवाडी (ता.खानापूर )  येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील यांचे चिरंजीव विनय व खानापूर तालुक्यातीलच अल्लेहोळ या गावचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग सटवाप्पा पाटील यांची कन्या मयुरी यांचा शुभ विवाह रविवार दि. 08 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजून 38 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर नंदगड येथील दक्षिण विभाग सोसायटीच्या हॉल मध्ये हा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला,


अलीकडच्या काही वर्षापासून मराठा समाजातील विवाह हे वेळेच्या मुहूर्तावर लागत नाहीत, डॉल्बीचा अतिरेक करून मुहूर्तापूर्वी व नंतर दारूच्या नशेत धूर्त तरुण वर्ग, हुंड्याची देवाण घेवाण,प्रिवेंडिंग शूटिंग व कर्ज काढून बडेजाव करत लग्न करण्याची प्रथा रूढ होत चाललेली आहे, यावरून समाजातील सुज्ञ लोकांतून नाराजीचा सूर दिसून येऊ लागला, यावर सुधारणा आणण्यासाठी व आपल्या पारंपरिक,सांस्कृतिक पद्दतीने लग्न व्हावे यासाठी प्रयत्नही करूनही या सर्व गोष्टींना फाटा देण्यात येत होता, यामुळे समाजाची तसेच वधू वर पक्षाची बदनामी होत होती.


गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाने घालून दिलेल्या आचारसहितेतील बहुतांशी नियम पाळून हा विवाह नातेवाईक,मित्रमंडळी व समाजातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत केवळ पंधरा दिवसांच्या अवधीत हा सोहळा वर व वधू पक्षाने पार पाडला.


ना डॉल्बीचा दणदणाट,ना नाचण्याचा धांगडधिंगा,ना प्रिवेडिंग शूटिंग,बडेजाव खर्च या सर्व गोष्टींची आचारसंहिता पाळत हा विवाहसोहळा सामोपचाराने दोन्ही कुटुंबांनी अगदी आनंदात पार पडला या दोन्ही कुटुंबांचा व पंच म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती