LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

प्यास फाऊंडेशन देणार हलशीवाडी येथील दोन तलावांना पुनरुज्जीवन

बेळगाव : बेळगावच्या प्यास फाऊंडेशनने हलशीवाडी येथील दोन तलावांना पुनरुज्जीवन देण्याचे काम हाती घेतले आहे.



या प्रकल्पांतर्गत हलशीवाडी येथील दोन तलावातील साठलेला गाळ काढून तलावाची संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच पाणी साठवण क्षमता वाढविली जाणार आहे.


सीएसआर भागीदार, एकेपी फेरोकास्टच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील हलशीवाडी येथील त्या दोन तलावांचे पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे.


शेती आणि ग्रामीण उपजीविकेवर पाण्याच्या टंचाईचा वाढता परिणाम लक्षात घेऊन, फाऊंडेशनने हलशीवाडी येथील या दोन महत्त्वाच्या तलावांच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे येत्या कांही वर्षांत शेतकरी आणि रहिवाशांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे या प्रकल्पासंदर्भात बोलताना प्यास फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी म्हटले. त्यांनी भंडारे परिवाराचे, विशेषतः या प्रकल्पाचे सीएसआर भागीदार, एकेपी फेरोकास्टच्या सहकार्याबद्दल पराग भंडारे आणि प्रीती भंडारे यांचे आभार मानले.
माजी ता. पं. सदस्य चंद्रकांत देसाई यांनी या प्रकल्पामुळे पाण्याची टंचाई कमी होण्यास, भूजल पातळी सुधारण्यास आणि गावाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यास मदत होईल असे सांगून प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक रहिवाशांकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले.
ज्येष्ठ गावकरी वामन देसाई यांनी पारंपरिक विधींनी प्रकल्प कामाला चालना दिली. त्यानंतर कामाचे औपचारिक उद्घाटन करण्यासाठी प्रतिकात्मक भूमिपूजन सोहळा पार पडला.
याप्रसंगी प्यास फाउंडेशनचे उपाध्यक्ष अभिमन्यू डागा, सचिव डॉ. प्रीती कोरे, सहसचिव अवधूत सामंत, खजिनदार लक्ष्मीकांत पसारी, संचालक रोहन कुलकर्णी, दीपक औलकर, अजय आचार्य, दत्तात्रय देसाई, माणिक देसाई, रघुनाथ देसाई, विनायक देसाई, रवींद्र देसाई, सुधीर देसाई, मिलिंद देसाई, देसाई, मिलिंद देसाई, श्रीमान देसाई, ग्रामस्थ प्रकाश देसाई, विष्णू देसाई, रमेश देसाई, उमेश देसाई, लव देसाई, नारायण देसाई, प्रमोद देसाई, राजन सुतार, विनोद देसाई यांच्यासह बरेच गावकरी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती