LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

राज्य परिवहनने अवघ्या 10 दिवसांत मिळविला 9 कोटींचा महसूल !

बेंगळूर : कर्नाटक सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या शक्ती योजनेअंतर्गत मोफत बससेवेमुळे राज्यातील परिवहन महामंडळांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, तसे काहीही झाले नसून राज्य परिवहन मंडळ तोट्यात नाही तर फायद्यात आले आहे.


कल्याण कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळ (KKRTC) ने केवळ 10 दिवसांत तब्बल 9 कोटी 10 लाख रुपये महसूल कमावला आहे.



आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर हे केवळ ज्योतिर्लिंग म्हणून नव्हे, तर कर्नाटकातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करतात.


यंदा गुढीपाडवा सणानिमित्त श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर येथे आयोजित यात्रेमुळे लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर श्रीशैल यात्रेमुळे विजापूर, बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ, कलबुर्गी आणि बीदर या सहा विभागांतून श्रीशैलकडे विशेष बससेवा सुरू केली होती. या बससेवेअंतर्गत अवघ्या 10 दिवसांत 1857 बसफेऱ्या झाल्या. शेकडो प्रवाशांनी प्रवास केला आणि यामुळे कल्याण कर्नाटक महामंडळाला या 10 दिवसांत 9 कोटी 10 लाख रुपयांचा थेट महसूल मिळाला.
मागील वर्षी देखील या यात्रेतून कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळने 7 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळवला होता.


यंदा ‘शक्ती’ योजनेअंतर्गत महिलांना मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आला असल्याने परिवहनला कदाचित तोटा सहन करावा लागेल, अशी शक्यता होती. पण, परिवहनने मागील यात्रेपेक्षा जादा महसूल यावर्षी मिळविला आहे.


परिवहन विभागाला सरकारकडून अनुदान दिलं जात असलं, तरी वेळोवेळी होणाऱ्या विलंबामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या या उत्पन्नामुळे महामंडळाच्या व्यवस्थापनात समाधान व्यक्त होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती