LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नंदगड येथे 3 रोजी धर्मजागृती सभेचे आयोजन

खानापूर : नंदगड येथील विरक्त मठाच्या आवारात रविवार दिनांक 3 मे रोजी भव्य धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मजागृती सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विरक्त मठाचे मठाधीश चन्नवीरेश्वर स्वामी यांनी केले आहे.



या धर्मजागृती सभेला तालुक्यासह इतर ठिकाणच्या मठांचे स्वामीजी तसेच राजकीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही मठाधीश चन्नवीरेश्वर स्वामी यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिली. यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, आपय्या कोडोळी, गुंडू तोपिनकट्टी, प्रशांत लक्केबैलकर, रवी पाटील, महंतेश बाळेकुंद्री यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी रुद्राक्षमठ, गोकाई महासंस्थान मठ, गोवा येथील ब्रह्मानंदाचार्य स्वामी, दत्त पिठाचे मठाधीश तसेच विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार विश्वेश्वर हेगडे, कागेरी, विधान परिषद सदस्य आणि कारवार बेळगाव मतदारसंघातील आमदार संमेलनला उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व भाषिक नागरिकांनी, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चन्नविरेश्वर स्वामीनी केले.


चन्नवीरेश्वर स्वामी पुढे म्हणाले, या धर्मसभेच्या अनुषंगाने गेल्या दोन महिन्यांपासून जनजागृती केली जात असून तालुक्यातील ग्रामीण भागातील 60 खेडोपाड्यात जाऊन धर्मजागृतीबाबत तसेच युवकांत देशभक्ती, देशप्रेम, तसेच व्यसनमुक्तीचा संदेश देत ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा शेवट नंदगड येथील विरक्त मठात आयोजित करण्यात आला असून रविवार दिनांक 3 रोजी भव्य धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मसभेच्या सुरुवातीला संगोळळी रायण्णा यांच्या स्मृतिस्थळापासून संमेलनस्थळापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती