LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आता शाळांमध्ये योग व आयुष पद्धतींना मिळणार चालना ..!

बेळगाव : जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी व अनुदानित शाळांमध्ये योग आणि आयुष पद्धती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी बेळगाव जिल्हा परिषदेकडून विशेष पाऊले उचलली जाणार आहेत. त्या अनुषंगाने शारीरिक शिक्षण शिक्षकांना योग प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना सोप्या योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवणे तसेच आयुष औषधी वनस्पतींबाबत माहिती देणे याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी जिल्हा आयुष अधिकारी तसेच तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना या उपक्रमांना बळकटी देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील आयुष डॉक्टरांनी आयुष उपचार पद्धती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकांशी व लोकप्रतिनिधींशी चांगले संबंध ठेवून सेवा अधिक प्रभावीपणे पुरवाव्यात, असे राहुल शिंदे यांनी नुकत्याच बोलाविण्यात आलेल्या आढावा बैठकीत सांगितले.
यासंदर्भात सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान तीन निवासी शाळा दत्तक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, औषध वितरण आणि योगविषयक माहिती देऊन त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
जिल्हा आयुष रुग्णालयात ‘आशा किरण-दृष्टी’ केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती देत, पंचकर्म आणि अग्निकर्म यांसारख्या उपचार पद्धती उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आयुष विभागाच्या विविध योजनांची जनजागृती करण्याचे तसेच उपलब्ध आयईसी निधीचा योग्य वापर करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. कोणत्याही रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासू नये याची दक्षता घेण्यास सांगितले.
या बैठकीस राज्य आयुष समन्वय अधिकारी चंद्रशेखर सिद्दापूर, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुनधोळी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती