बेळगाव : राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल वापरलेले अश्लील शब्द विधान परिषद आमदार सी. टी. रवी यांना चांगलेच भोवले आहेत.
आमदार पदावरून त्यांची हकालपट्टी होईतोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. या मागणीसाठी नारी शक्तीही आज आक्रमक झाली.
सी. टी. रवी यांच्याविरोधात लक्ष्मी हेब्बाळकर समर्थक उग्र झाले असून राज्यपालांनी रवी यांचा राजीनामा घेईतोपर्यंत विविधमार्गे आंदोलन सुरू ठेवले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
