बेळगाव : बेळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन च्यावतीने 14 वर्षांखालील मुलां-मुलींसाठी जिल्हा ॲथलेटिक्स संघ निवड चाचणी व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ही निवड चाचणी जिल्हा स्टेडियम, बेळगाव येथे पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातून सुमारे 100 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
चाचणीत एकूण 10 खेळाडूंना निवडण्यात आले. मुलांमध्ये समक्ष कुंभार 100 मी. व 200 मी., सक्षम कुंभार 100 व 200 मीटर 4x100 मी रिले, विराज कुगजी 400 मी 4x100 मी रिले, अनूज हनगोजी 400 मी, 600 मी. 4x100 मी रिले, पार्थ कणबरकर थाळी फेक तर मुलींच्या विभागात ज्योत्स्ना हंगीरकर 100 मी .200 मी 4x100 रिले, माधुरी पाटील 200 मी 400 मी 4x100 मी रिले, स्नेहल नाईक 600 मी 4x100, समीक्षा कर्तसरकर 200 मी 400 मी 4x100 मी रिले, सेजल धामणेकर लांब उडी व उंच उडी, 4x100 रिले तसेच राखीव म्हणून ऋतुजा जाधव भाला फेक म्हणून निवड केली गेली आहे.
6 ते 8 नोव्हेंबर 2025 दरम्यान श्री कंटेरवा स्टेडियम बेंगळुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक स्पर्धेत हे खेळाडू बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
निवड चाचणी वेळी बेळगांव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिशन बेळगांवचे अध्यक्ष किरण जाधव यासह उपाध्यक्ष संभाजी देसाई, सचिव अशोक शिंत्रे, क्रीडा भारती कर्नाटक प्रांत सह कार्यवाह विश्वास पवार, व कार्यक्रमाचे सचिव डॉ.मधुकर देसाई उपस्थित होते.
अशोक शिंत्रे यांनी स्पर्धेची माहिती दिली. किरण जाधव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. उमेश बेळगुंदकर यांनी आभार व्यक्त केले.
स्पर्धे साठी पंच म्हणून शिरीष सांबरेकर, महेश मोरे, अनंत पाटील, सूरज पाटील, वैभव गडकरी, आकाश लाड, मयुरी पिंगट, ऐश्वर्या नेसरकर उपस्थित होते.
चाचणीतील विजेत्या खेळाडूंना प्रमाण पत्र आणि पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. उकृष्ठ धावपटू म्हणून मुलामध्ये सक्षम कुंभार व मुलींमध्ये माधुरी पाटील या दोघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.