LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हुबळीत बैठक : बेळगाव रेल्वे समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न

बेळगाव : कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टर यांनी हुबळीत दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांसमवेत बैठक घेऊन, बेळगाव मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विविध रेल्वे प्रकल्पांविषयी चर्चा केली.


सुळेभावी गावातील समस्येसंदर्भात :
बेळगाव मतदारसंघातील सुळेभावी येथील एल.सी. क्र. 79/अ जवळ बांधण्यात आलेल्या नव्या अंडरपासच्या अकार्यक्षम रचनेमुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी योग्य संपर्क रस्ता तातडीने बांधण्याची मागणी करण्यात आली. यावर महाप्रबंधकांनी वरिष्ठ अभियंत्यांना पाहणीस पाठवून लवकरच उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले.



घटप्रभा रेल्वे स्थानकाजवळील अतिक्रमण प्रकरण :
घटप्रभा येथील रेल्वेच्या जमिनीवर घरकुल बांधले गेले असून, रहिवाशांना वारंवार नोटिसा पाठविल्या जात आहेत. संबंधित नागरिकांकडे मालकी हक्काचे पुरावे असल्याने याप्रकरणाची पुन्हा चौकशी करून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची विनंती करण्यात आली. यावरही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.



नवीन रेल्वे मार्ग सर्वेक्षणाची मागणी : लोकापूर-रामदुर्ग-सवदत्ती-धारवाड या प्रस्तावित नव्या मार्गासाठी पूर्वसर्वेक्षण आवश्यक असून, त्यासाठी लवकरच पावले उचलण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.



बेळगाव–कित्तूर–धारवाड मार्ग :
बेळगाव–कित्तूर–धारवाड या नव्या मार्गासाठी भूमी अधिग्रहण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच निविदा काढून काम सुरू केले जाईल.



‘वंदे भारत’ ट्रेनचे बेळगावपर्यंत विस्तार :
बेंगळुर-धारवाड दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बेळगावपर्यंत विस्तारित करण्याच्या प्रस्तावासंदर्भात रेल्वे बोर्डकडे पाठवले गेले असून, लवकरच मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



बेळगाव शहरातील उड्डाणपुलांचे काम :
बेळगाव शहरातील एल.सी. क्र. 381, 382, 383 जवळ होणाऱ्या उड्डाणपुलांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.



बेळगाव–मनुगुर एक्सप्रेस पुन्हा सुरू होणार :
ही रेल्वे सेवा पूर्वी बंद करण्यात आली होती. जनतेच्या मागणीनुसार, लवकरच ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे महत्त्वाचे आश्वासन यावेळी देण्यात आले.



बेळगाव–मिरज–बेळगाव मेमो ट्रेनची मागणी :
या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, सदर रेल्वेला मेमो ट्रेनमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे पाठवण्यात आला आहे.



या बैठकीत झालेली चर्चा सकारात्मक झाली असून, रेल्वे महाप्रबंधकांनी सर्व मुद्द्यांवर सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद दिला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील मागण्या लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास खासदार जगदीश शेट्टर यांनी एका व्यक्त केला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती