LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

राज्यातील विविध ठिकाणी लोकायुक्तांचे छापे : शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

बेंगळूर : लोकायुक्त पोलिसांनी आज राज्यातील विविध ठिकाणी छापे टाकून झाडाझडती चालविली आहे.
लोकायुक्त पोलिसांनी आज गुरुवारी सकाळपासूनच कोलार, यादगिरी, दावणगेरे आणि बेंगळूरमधील विविध भागात छापे टाकले.


उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती मिळवणे तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित प्रकरणांसंबंधी लोकायुक्त पोलिसांनी हे धाडसत्र अवलंबले आहे.



या छाप्यामुळे राज्यभरातील शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.


लोकायुक्त पोलिसांनी कोलार तालुक्यातील भूमापन विभागाचे सर्वेक्षक अधिकारी सुरेश बाबू जी., सुरपूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजीव वेंकटप्पा नायक, कर्नाटक नगर जलपुरवठा व सांडपाणी मंडळ (दावणगेरे) चे सहायक कार्यकारी अभियंता एम.बी. रवि, तसेच जलसंपदा विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता जी. श्रीनिवास मूर्ती यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकून झडती चालवली आहे.
या धाडीत महत्वाचे कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे आणि अन्य पुरावे जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती