बेळगाव : लहान मुलांच्या जीवनावर आधारित ' लिटल स्ट्रायकर्स ' या हिंदी चित्रपटासाठी बाल कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवार दिनांक 2 आणि रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूल येथे ऑडिशन्स घेतली जाणार आहे.

ही ऑडिशन्स फक्त 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी घेतली जाणार असून शनिवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत तर रविवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत ही ऑडिशन्स घेतली जाणार आहे.
हा चित्रपट अस्मिता एंटरप्राइजेस संस्था निर्मित आणि राजेंद्र जैन प्रस्तुत तसेच संतोष सुतार दिग्दर्शित आहे. इच्छुकांनी आपली संपूर्ण माहिती 08197271256 अथवा 09739037858 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
[video width="540" height="810" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/07/VID-20250721-WA0218.mp4"][/video]