LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अंधश्रद्धा ही घातक ; अंधश्रद्धेचे उच्चाटन गरजेचे : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

BN7 News : अंधश्रद्धा ही घातक ठरते. यासाठी अंधश्रद्धेचे उच्चाटन होणे गरजेचे आहे, असे महिलां आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.


महिला दिनाचे औचित्य साधून जीडी मीडिया हाऊस यांच्या वतीने बेंगळूर येथील एका खाजगी हॉटेलमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना 'साधकी' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या.


गावागावात आणि गल्लो -गल्लीत आजही अंधश्रद्धेचे प्रकार पहावयास मिळतात. अंधश्रद्धेमुळे माणसाचा आत्मविश्वास ढासळतो, प्रगती खुंटते. यामुळे अंधश्रद्धेचे उच्चाटन होणे काळाची गरज आहे. असे महिलां आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. यावेळी त्यांनी अंधश्रद्धेला जीवनातून कडेलोट करण्याचे आवाहन महिलांना केले.


आज महिला या अबला राहिल्या नाहीत तर त्या सबला बनल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या समाजात कार्य करतात. आज महिलांनी सर्व क्षेत्रे काबीज केली आहेत. घर आणि मूल सांभाळता त्यां समाजातही खंबीरपणे उभ्या आहेत, हे प्रशंसनीय आहे, असेही लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या


महिलांनी स्वतःला सक्षम बनविले पाहिजे. आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण आणि उच्च शिक्षण देऊन त्यांनी घडवावे असे आवाहनही त्यांनी महिला भगिनींना केले.



यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी, वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कुमार, चित्रपट अभिनेते अनिरुद्ध जतकर, अभिनेत्री संपदा, जीडी मीडिया हाऊसच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता गौडा, हेमा सागर उपस्थित होत्या.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती