हुबळी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने नववीत शिकणाऱ्या आपल्या मित्राचा चाकूने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना काल सोमवारी रात्री हुबळी येथील गुरुसिद्धेश्वर नगरातील मुरसावीर मठाजवळ घडली.
