LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

खानापूर तालुका समितीने वाहिली अजितदादा पवार यांना आदरांजली

खानापूर तालुका समितीने वाहिली अजितदादा पवार यांना आदरांजली


खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. खानापुरातील राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित शोकसभेला खानापूर तालुका महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अजित दादांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व त्यानंतर एक मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.


अजितदादा यांच्या निधनाने महाराष्ट्राबरोबरच सीमाभागावरती शोककळा पसरली आहे असे खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यावेळी बोलताना म्हणाले.
तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी, अजितदादा यांच्या निधनाने जसा पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसा आम्हा सीमावासीयांवरही कोसळला असल्याचे म्हटले.
सीमाप्रश्नाची सोडवणूक ही जर अजितदादांच्या ह्यातीत झाली असती तर फार चांगलं झालं असतं. पण त्यांच्या आकस्मिक निधनाने एक पोकळी निर्माण झाली आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अजितदादा यांना श्रद्धांजली ठरेल, असे अध्यक्ष गोपाळराव देसाई म्हणाले.


खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी अजित दादांना श्रद्धांजली वाहताना, अजित दादांच्या जाण्याने युवा पिढीला फार मोठा धक्का बसलेला आहे आणि सीमावावासीयांचे फार मोठे नुकसान झालेलं आहे, येत्या नजीकच्या काळात संघटित राहून सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडवून घेणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली असे म्हटले.


गोपाळ पाटील, विलास बेळगावकर यांनीही श्रद्धांजली वाहतांना अजित दादांना भेटलेल्या जुन्या आठवणी सांगून श्रद्धांजली वाहिली.
कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, तज्ञ कमिटीचे सदस्य प्रकाशराव चव्हाण, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, रुक्मांना झुंजवाडकर यांचीही याप्रसंगी श्रद्धांजलीपर भाषणे झाली.


यावेळी रणजीत पाटील, डी. एम. भोसले, रुक्‍मांना झुंजवाडकर, पुंडलिक पाटील, मरू पाटील, कृष्णा मनोळकर, जयसिंगराव पाटील, विशाल बुवाजी यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती