LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कराटेपटू कृष्णा शर्मा ह्याला ब्लॅकबेल्ट प्रदान

 

बेळगाव : श्री ब्रह्मलिंग देवस्थान खादरवाडी बेळगाव येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 100 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते .बेळगाव जिल्ह्याचे मुख्य कराटे परीक्षक गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली.


या वेळी कराटेपटूं कृष्णा शर्मा ह्याला ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आला. कृष्णा शर्मा हा गेल्या 5 वर्षापासून मनोप्रभा मंगल कार्यालय येथील कराटे क्लासमध्ये सातत्याने कराटे खेळाचा सराव करीत होता. त्याने राज्य आणि राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली आहेत.
मुख्य कराटे प्रशिक्षक तसेच इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते कृष्णा शर्मा ह्याला ब्लॅकबेल्ट , प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मनोहर पिंगट (खादरवाडी गावचे अध्यक्ष), मनोहर पाटील (ब्रह्मलिंग देवस्थान कमिटीचे अध्यक्ष), अमित बिर्जे (ब्रम्हलिंग स्पोर्टस् क्लबचे प्रशिक्षक) उपस्थित होते.



हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक परशुराम काकती, प्रभाकर किल्लेकर,निलेश गुरखा, नताशा खानापूरकर, रतिक लाड, किरण गडकर आणि सिद्दिका देवलापुर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कृष्णा शर्मा हा गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षक हरिष सोनार यांच्याकडे कराटेचा सराव करतो.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती