LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कराटेपटू कल्याणी ताशिलदार हिला ब्लॅकबेल्ट प्रदान

बेळगाव ( bn7 news) : बेळगाव जिल्ह्याचे मुख्य परीक्षक गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत खेळाचे उल्लेखनीय दर्शन घडविणाऱ्या कराटेपटू कल्याणी ताशिलदार हिला ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.
महांत भवन, महांतेश नगर, बेळगाव येथे ही कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 55 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते .


कल्याणी ताशिलदार ही गेल्या चार वर्षापासून कराटेचा सातत्याने सराव करते. याआधी तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली आहेत. इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते कल्याणी ताशिलदार हीला ब्लॅकबेल्ट , प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कल्याणीचे पालक महेश ताशिलदर, श्रीमती. नंदा ताशिलदर यांचादेखील शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कल्याणीला प्रशिक्षक परशुराम काकती यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आनंद गुडस ( सरचिटणीस, आर.बी.डी), लखन जाधव (गुरुवर्य सव्यासाची गुरुकुलंम , कोल्हापूर), सिद्राय गुगरट्टी( निवृत्त सुभेदार मेजर), चंद्रशेखर मरिगौडर ( निवृत्त हवालदार, आर्मी), बाळासाहेब पसारे ( फिजिकल कमांडो ट्रेनर, आर्मी), जावेद तासेवाले ( निवृत्त ए.सी.पी हवालदार, आर्मी), दिगंबर पवार ( चेअरमन मराठा बँक), विशाल ताशिलदर ( व्यावसायिक, बेळगाव), गजेंद्र काकतीकर ((बेळगांव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष) उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर तसेच प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, विजय सुतार, परशराम नेकनार, लक्ष्मण कुंभार, नताशा अष्टेकर, काव्या बडीगेर , सहील काकती, रितू चौगुले, पार्थ चौगुले, जयकुमार मिश्रा, विनायक दंडकर, संजीव गस्ती आणि कृष्णा जाधव
यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन श्रीमती तेजस्विनी ओमकार तमुचे यांनी केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती