कपिलेश्वर मंदिरातर्फे रक्तदान शिबीर : अधिकृत वेबसाईटचे करण्यात आले उदघाटन
बेळगाव : श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे 75 रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले. यानंतर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उदघाट्न करण्यात आले.
मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष राहूल कुरणे यांच्या हस्ते पुजा करून रक्तदान शिबिराला चालना देण्यात आली. गरजु रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी स्वयंप्रेरणेने रक्तदान करू इच्छिणाऱ्या रक्तदात्यांची रक्त गट नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यावेळी 160 हून अधिक जणांनी मंदिर विभागाकडे रक्तदान नोंदणी केली. कपिलेश्वर मंदिरातर्फे पहिल्यांदाच हा उपक्रम पार पाडण्यात आला. यानंतर असे उपक्रम वारंवार करण्याचे निश्चित करण्यात आले. पहिल्यांदाच पार पडलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी केएलई इस्पितळ रक्त पेढीचे सहकार्य मिळाले.
यावेळी मंदिर विश्वस्त समितीचे सचिव अभिजीत चव्हाण यासह विवेक पाटील, राजू भातकांडे, अजित जाधव, राकेश कलघटगी, प्रथमेश कावळे, जोतिबा कावळे, अविनाश खन्नुकर, अभय लगाडे, प्रताप बाचोळकर, अभि पवार, महेश सांबरेकर, रमेश देसुरकर आदी सेवेकरी, ट्रस्ट्री उपस्थित होते.
मंदिर वेबसाईटचे उदघाटन ....
[video width="640" height="360" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2026/02/VID-20260203-WA0044.mp4"][/video]