LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' जितो हर्षोत्सव ' 9 व 10 मे रोजी : हर्षवर्धन इंचल यांनी दिली माहिती

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) बेळगाव तसेच जितो केकेजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 9 व 10 मे रोजी दोन दिवसीय ‘जितो हर्षोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



हा कार्यक्रम बेळगाव येथील केएलई शताब्दी सभागृहात पार पडणार असल्याची माहिती जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


जितो ही सेवाभावी संस्था दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर यांसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. यंदा ‘जितो हर्षोत्सव’च्या माध्यमातून बेळगावकरांना अधिक ज्ञान मिळावे या उद्देशाने विविध क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, असेही हर्षवर्धन इंचल यांनी सांगितले.
9 मे रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होणार असून राष्ट्रीय व्यापार विकास मंडळाचे अध्यक्ष सुनील शिंघी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. ते यावेळी विशेष व्याख्यानही देणार आहेत. यावेळी जितो अपेक्स पदाधिकारी उपस्थित राहतील.
दुपारच्या सत्रात शांदार शांतिभाई हे विविध वास्तव जीवनातील कथा सादर करतील. तसेच जादू आणि मानसिक कौशल्यासाठी प्रसिद्ध विवेक शिंघी हे उपस्थितांसमोर जादूचे प्रयोग सादर करतील. सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध गायक विवेक डी. पारेख व संघ भक्ति संगीताचा विशेष कार्यक्रम सादर करतील.
10 मे रोजी सकाळच्या सत्रात आध्यात्मिक मार्गदर्शक ऋषी नंदा हे ‘दैवी शक्ती आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर कृष्णा राठी हे वैयक्तिक आणि व्यावसायिक ब्रँड निर्माण यावर विचार मांडतील. तसेच भारताचे माजी राजनैतिक अधिकारी आणि केंद्र सरकारचे सल्लागार डॉ. दीपक वोरा हे “जामवंत परिणाम – इंडिया कसे भारत बनते” या विषयावर व्याख्यान देतील.
दुपारच्या सत्रात राहुल कपूर हे ‘ जीवनात सर्व काही शक्य आहे’ या विषयावर बोलणार असून त्यानंतर यशस्वी युवा उद्योजकांची मुलाखत घेतली जाईल, अशी माहिती कार्यक्रम संयोजक विक्रम जैन यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना दिली.
या सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश फक्त आमंत्रण पत्रिकेद्वारेच दिला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला जितोचे पदाधिकारी अभय आदिमनी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती