LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

60 वर्षे झाली, पण नुकसानभरपाई नाही : शेतकऱ्यांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कार जप्त

बेळगाव (bn7 news): रुग्णालयाकरिता जमीन देऊन 60 वर्षे झाली, पण जमिनीच्या मोबदल्यात नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. या प्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची (DHO) शासकीय कार जप्त करण्याचे आदेश दिले.


फकीरप्प तळवार, मल्लिकार्जुन तळवार आणि अशोक तळवार या तिघा शेतकऱ्यांनी रुग्णालयासाठी आपली जमीन दिली होती. मात्र, 60 वर्षे लोटली तरी जमिनीच्या बदल्यात नुकसानभरपाई मिळाली नाही. अखेर या शेतकऱ्यांनी न्यायालयात न्याय मागितला. न्यायालयाने नुकसानभरपाई न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कार जप्त करण्याचे आदेश दिले.


न्यायालयीन आदेशानुसार हे शेतकरी आपल्या वकिलांसोबत कार जप्तीसाठी पोहोचताच, कारचालक वाहन घेऊन पसार झाला होता. यामुळे संतप्त वकिलांनी आणि शेतकऱ्यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. अखेर अधिकाऱ्यांनी जप्तीसाठी तीच कार पुन्हा आणून दिली.


न्यायालयाचा निर्णय आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कार जप्ती हा विषय चांगलाच चर्चिला जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती