LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात

बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बेळगावमधील तीन कर्तबगार महिला डॉ. माधुरी हेब्बाळकर, नाट्यकर्मी पद्मा कुलकर्णी व प्राचार्या नीशा राजेंद्रन यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.



प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक यांनी भारत विकास परिषदेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी सत्कारमूर्तींची ओळख करून दिली. सत्काराला उत्तर देताना डॉ. माधुरी हेब्बाळकर, पद्मा कुलकर्णी व नीशा राजेंद्रन यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपली मनोगते व्यक्त केली.



दुसऱ्या सत्रात महिलांसाठी खास आकर्षण "होम मिनिस्टर" खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्व महिलांनी हिरिरीने सहभागी होऊन आनंद लुटला. विनायक मोरे यांनी स्पर्धेचे नेटके संयोजन केले. ज्योत्स्ना गिलबिले यांनी अखेर स्पर्धा जिंकून होम मिनिस्टरचा बहुमान मिळविला. त्यांना सुंदर अशी साडी देऊन अतिथिंच्या हस्ते गौरविण्यात आले.



कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले. जया नायक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. यावेळी उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, शुभांगी मिराशी, लक्ष्मी तिगडी, योगिता हिरेमठ, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, तृप्ती देसाई, नंदिनी पाटील, कांचन कलघटगी, नंदिता गिलबिले, अनिता हिडदुग्गी, शालिनी नायक, अमिता केकरे, प्राचार्य व्ही. एन. जोशी, एन. बी. देशपांडे, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, डॉ. अरविंद कुलकर्णी, विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील, सुभाष मिराशी, विजयेंद्र गुडी, रामचंद्र तिगडी, जयंत जोशी, विनोद देशपांडे, किशोर काकडे, शुभकांत कलघटगी, ॲड. सचिन जवळी, पी. जे. घाडी, विजय हिडदुग्गी आदि उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती