LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' आशाकिरण ' गतिमंद मुलांच्या निवासी शाळेचे उदघाटन

बेळगाव : समाजात विविध संस्थाआणि सामाजिक कार्यकर्ते आपापल्यापरिने सामाजिक ऋण फेडण्यासाठी सेवाकार्य करीत आहेत. अशा संस्थांमुळेच समाजात चांगुलपणा टिकून असून समाजाचे हित साधले जात आहे. अशा संस्था समाजासाठी एक आदर्श निर्माण करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे, असे विचार सतीश शुगर्स फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.



ऑटोनगर-बेळगाव येथे ' गतिमंद मुलां-मुलींसाठी आशाकिरण ' नावाने निवासी शाळा सुरू करण्यात आला आहे. या निवासी शाळेच्या उदघाटन समारंभात बोलताना प्रियांका जारकीहोळी यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रियांका जारकीहोळी यासह बेळगाव उत्तर मतदार संघाची आमदार राजू सेठ, जयभारत फाउंडेशनचे दयानंद कदम, सामाजिक कार्यकर्ते टी. के. पाटील, आशा ज्योती अनुसूचित जाती-जमाती महिला विकास केंद्राच्या अध्यक्षा जयश्री माळगी याप्रसंगी उपस्थित होत्या.



प्रारंभी आशाकिरण गतिमंद मुलांच्या निवासी शाळेच्या संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यानंतर प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते फित कापून निवासी शाळेचे उदघाटन करण्यात आले.



यावेळी प्रियांका जारकीहोळी यांनी, 'आशा किरण ' शाळा ही गतिमंद मुलांसाठी आशेचा किरण ठरेल असे यावेळी बोलताना म्हटले. यावेळी अन्य पाहुण्यांचीही भाषणे झाली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती