बेळगाव : गोजगा रोड, मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सहकारी सोसायटीचे उद्घाटन रविवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
[video width="848" height="478" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250621-WA0302.mp4"][/video]
समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोसायटी (संघा)चे संस्थापक व चेअरमन आर. एम. चौगुले राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश पोतदार, एन. एस. चौगुले, डॉ. ए. एम. गुरव, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, दादागौडा बिरादर, मालोजीराव अष्टेकर, हर्षवर्धन इंचल, रमाकांत कोंडुस्कर, मदन बामणे, को-ऑप. सोसायटी असिस्टंट रजिस्ट्रार झुबीउल्ला के., लक्ष्मी यळगुकर, डॉ. सविता देगिनाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हितचिंतकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आर. एम. चौगुले यांनी कळविले आहे.