बेळगाव ( bn7 news) : वाणिज्य सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुबळीच्या रुपतारा हिने क्लासिक मिसेस इंडिया, कर्नाटक - 2024 सौंदर्य स्पर्धेत उपविजेतेपदाचा मुकुट मिळविला.
बेंगळूरच्या किंग्ज मेडोज येथे प्रतिभा सौंशीमठ यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या क्लासिक मिसेस इंडिया, कर्नाटक या आठव्या फॅशन शो सौंदर्य स्पर्धेत हुबळीची सौंदर्यवती रुपतारा सांगलीकर -सावळगीमठ यांनी रनर अप पदाचा मुकूट मिळवत कर्नाटक विभागातून तिने राष्ट्रस्तरीय सौंदर्य स्पर्धेपर्यंत मुसंडी मारली आहे.या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील बहुसंख्य सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत बाजी मारत वाणिज्य शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या रुपतारा सांगलीकर - सावळगीमठ हिने ' बेस्ट फोटोजेनिक अवॉर्ड ' तसेच धारवाड जिल्हा फेरीत पहिला क्रमांक पटकाविला आहे.
