LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावमध्ये आज सायंकाळी ‘हेमरेड्डी मल्लम्मा’ नाट्यप्रयोग

बेळगाव : बेळगावच्या ‘रंगसृष्टी’ या नाट्यसंस्थेच्या कलाकारांकडून आज दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता, नेहरू नगर येथील कन्नड भवनात ‘इळेय बेळकू (महासाद्वी हेमरेड्डी मल्लम्मा)’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.


डॉ. रामकृष्ण मराठ यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन शिरीष जोशी यांनी केले आहे.
या नाटकाचे आयोजन बेळगाव रड्डी संघ व कन्नड भवन यांच्या सहकार्याने होत असून, याचे प्रायोजक रंगसृष्टीचे अध्यक्ष रमेश जंगल आहेत.


या नाटकात शांता आचार्य, शारदा भोज, शरणगौडा पाटील, शरणय्या मठपती, श्रद्धा पाटील, शोभा बनशंकर, विश्वनाथ देसाई, जयश्री के.एम., शांता जंगल, रमेश मिर्जी, डॉ. पी. जी. केंपण्णवर, रमेश जंगल, जयश्री क्षीरसागर, ज्योती बडामी, शैलजा भिंगे, जयशिला ब्याकोड, पुष्पा मरडूर, गंगा तिम्मनायक आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत.


शरणगौडा पाटील यांच्या रंगसजावटीत, दिवंगत नाट्यभूषण एनगी बाळप्पा यांच्या संगीत दिग्दर्शनात आणि विदुषी मंजुळा जोशी, मुद्धू मोहन तसेच दिवंगत शिवानंद पाटील आणि सुभद्रम्मा मन्सूर यांच्या पार्श्वगायनात हा प्रयोग सादर होणार आहे.


नाटकासाठी नारायण गणचारी तबलावादन, रमेश मिर्जी संगीत संयोजन, शांता आचार्य नृत्य संयोजन तर राजकुमार कुंबार तांत्रिक सहाय्य पुरवणार आहेत.


प्रवेश विनामूल्य असून, अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून प्रयोगाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ‘रंगसृष्टी’च्या वतीने करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती