LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हसिरू सेना खानापूर तालुकाध्यक्षपदी महावीर तवनप्पा गौडर यांची निवड

खानापूर : कर्नाटक राज्य शेतकरी संघटना, हसिरू सेना (वासुदेव मेटी गट) तालुका अध्यक्षपदी कसमळगी गावचे महावीर तवनप्पा गौडर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कल्मीश गोकाक यांनी नियुक्तीचा हा आदेश जारी केला.


हसिरू सेना (वासुदेव मेटी गट) जिल्हाध्यक्ष कल्मीश गोकाक यांच्या सूचनेनुसार खानापूर तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
गंदिगवाड गावचे बसवराज तम्मन्ना बंगी यांची उपाध्यक्षपदी, कसमळगी गावचे अप्पाजी माडकर यांची मुख्य सचिव पदी, एम. एम. राजीबाई यांची संघटना सचिवपदी, इसाक दावलसाब साहेबखान यांची खजिनदारपदी आणि चिक्क अंगरवळ्ळी गावचे बसवराज चंद्रप्पा मादिगर यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
गंदिगवाड येथे आयोजित शेतकरी संघटनेच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी गोकाक तालुका अध्यक्ष गोपाल, मूडलगी तालुका अध्यक्ष भीमसी, राज्य महिला मुख्य सचिव कमला पाटील, जिल्हा प्रधान सचिव देवीप्रसाद मुलिमनी यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.


कर्नाटक राज्य शेतकरी संघटना हसिरू सेना (वासुदेव मेटी गट) या संघटनेचे राज्यस्तरीय संघटन बांधणीचे कार्य जोमाने सुरू असून शेतकऱ्यांवर विविध क्षेत्रांत होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. राज्याच्या सीमावर्ती खानापूर तालुक्यात नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करून संघटना अधिक बळकट केली जाणार असल्याचे यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष कल्मीश गोकाक यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी आपल्या समस्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती