LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बजरंग दल व विहिप तर्फे हनुमान जयंतीदिनी खानापुरात भव्य शोभायात्रा

खानापूर (bn7 news) : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल खानापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जन्मोत्सवानिमित्त दिनांक 12 एप्रिल रोजी खानापूर शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीनिमित्त खानापूरमध्ये ही शोभायात्रा भव्यतेने साजरी करण्यात येणार आहे. ही शोभायात्रा शनिवारी 12 रोजी दुपारी 4 वाजता जांबोटी क्रॉस येथील मलप्रभा क्रीडांगण येथून सुरू होऊन जांबोटी क्रॉस रोड, राजा शिव छत्रपती चौक मार्गे, स्टेशन रोडने चिर्मुरकर गल्लीतील ज्ञानेश्वर मंदिर येथे यात्रेची सांगता होणार आहे.


या शोभायात्रेत भगवान श्रीराम व श्री हनुमान यांच्या जीवनावर आधारित सजवलेले रथ आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार आहेत.


बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत तालुक्यातील विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बजरंग दल तालुका अध्यक्ष किरण अष्टेकर यांनी केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती