LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गोवा पर्यटनप्रेमींनो सावधान : नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणार तुरुंगवास ....!

गोवा : गोवा पर्यटनप्रेमींनो सावधान. गोवा सरकारने पर्यटकांसाठी नवे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास बसणार दंड, प्रसंगी होणार तुरुंगवास ....!


पर्यटकांचं पसंदीचं पाहिलं ठिकाण म्हणजे गोवा.तरुणाईचे एक-दोन दिवसांचे मनमुराद आनंद घेण्याजोगे असणारे पिकनिक ठिकाण म्हणजे गोवा. एकंदर गोवा म्हणजे तरुणाईच्या पर्यटनाच्या यादीतील पहिले ठिकाण! मात्र, आता स्वच्छतेच्या अनुषंगाने गोवा सरकारने काही कडक नियम अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.


गोव्याच्या दिशेने निघालेल्या किंवा गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे मद्याची बाटली सापडल्यास ती जप्त केली जात होती, हे आपण जाणतोच. पण आता नव्या नियमावली अंतर्गत गोवा सरकारने पर्यटकांसाठी एक मोठा झटका दिला आहे. यापुढे गोव्यात जाताना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर, स्टोव्ह आणि स्वयंपाकसामग्री नेण्यावर त्या सरकारने बंदी घातली आहे.


रस्त्याच्या कडेला थांबून स्वयंपाक करून खाणाऱ्यांवर सरकारने थेट बंदी घातली असून, याचे उल्लंघन केल्यास कारवाई निश्चित आहे. गोवा सरकारच्या या नव्या आदेशामुळे थोड्याच दिवसांसाठी कुटुंबीय किंवा मित्रांसह गोवा फिरायला जाणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
गोव्यात फिरायला हरकत नाही, पण रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करून खाल्ल्यास आता तुरुंगवासही होऊ शकतो.


कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यांमधून पर्यटक गोव्यात येतात. अनेकदा हे पर्यटक रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून स्वयंपाक करतात, जेवणावळी उरकतात आणि पत्रावळ्या व इतर कचरा गोळा तेथेच टाकून देतात. त्यामुळे कचरा निर्माण होतो आणि सार्वजनिक स्वच्छतेवर परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर गोवा सरकारने हे कठोर नियम लागू केले आहेत.


पर्यटनामध्ये आपली खास ओळख निर्माण केलेल्या गोव्याने आता स्वच्छतेच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले आहे.आता गोव्यात गाडीने जाताना गॅस सिलिंडर, स्टोव्ह, भांडी व इतर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू आढळल्यास त्या तपासणीदरम्यानच जप्त केल्या जातील. गोव्याच्या चेकपोस्टवर पोलीस यावर काटेकोर तपासणी करत आहेत.
रस्त्याच्या कडेला स्वयंपाक केल्यास केवळ साहित्यच नव्हे तर पर्यटकांची वाहनेही जप्त केली जातील आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


तरी गोव्यात पर्यटनाला जाणाऱ्यांनी नवीन नियमांची माहिती ठेवून त्यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पर्यटनाचा आनंद तुरुंगात बदलू शकतो!

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती