सेलम : कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीला धडकली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले.
डी. रणाराम ( वय 55 ), आर. जोड्थी देवी ( वय 50), डी. जेहकराम (वय 59) आणि जे. जोहित देवी ( वय 55 ) सर्वजण राहणार मूळचे राजस्थान, सध्या राहणार बळळारी, कर्नाटक अशी अपघातातील मृतांची नावे असून या अपघातात यू. अमैया देवी, जोक्थी देवी, आणि जोधाराम हे तिघेजण जखमी झाले आहेत.
डी. रणाराम हे पत्नी आर. जोड्थी देवी, भाऊ डी. जेहकराम, नातेवाईक जे. जोहित देवी आणि यू. अमैया देवी, जोक्थी देवी, आणि जोधाराम यांच्यासह कारने तिरुवण्णामलाईहून सेलमकडे चालले होते.
सेलम-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावरील वझापाडीजवळील पुधुपट्टी मारीअम्मन मंदिराजवळील उड्डाणपुलावर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीला आदळली. यामध्ये
डी. रणाराम हे पत्नी आर. जोड्थी देवी, भाऊ डी. जेहकराम, नातेवाईक जे. जोहित देवी यांचा मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वझापाडी सरकारी रुग्णालय आणि सेलममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]