LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भाजप नेत्यांचा पोलिस ठाण्याला घेराव ! ' त्या ' काँग्रेस आमदारांवर एफआयआरची मागणी

कोडगु : भाजप नेत्यांनी कोडगूमध्ये निदर्शने करीत डिवायएसपी कार्यालयाला घेराव घातला. मात्र, पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेत घेराव मोडीत काढला.


भाजप कार्यकर्ते विनय सोमय्या यांच्या आत्महत्येप्रकरणी काँग्रेस आमदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करत भाजप नेत्यांनी कोडगूमध्ये निदर्शने केली आणि डिवायएसपी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत भाजप नेत्यांना ताब्यात घेतले.


या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, खासदार यदुवीर वाडियार, माजी खासदार प्रताप सिम्हा, माजी आमदार के.जी. बोपैय्या व प्रीतम गौडा यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.



विजयेंद्र यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका करत “काँग्रेस सरकार म्हणजे खुनी सरकार आहे, असे म्हटले. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावरही विजयेंद्र यांनी आगपाखड केली. पोलीस प्रशासन सरकारच्या हातातील बाहुले बनले आहे, असा आरोप करीत पोलिसांनी जर कायद्यानुसार वागले नाही, तर जनता पोलीस ठाण्यांवर धावा बोलेल आणि त्याची जबाबदारी पोलिसांची असेल.”असेही विजयेंद्र म्हणाले.


विनय सोमय्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत भाजप नेत्यांनी पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला.
काँग्रेस आमदार पोन्नण्णा आणि मंथरगौडा यांच्यावर अद्याप एफआयआर नोंदवले नसल्याने भाजप नेत्यांनी डिवायएसपी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. त्यावेळी तिथे तणाव निर्माण झाला आणि पोलिस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती