LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

तब्बल पंधराशे विद्यार्थ्यांनी केली बेळगावच्या राजांची महाआरती : बाप्पाच्या जयघोषाने निनादला परिसर

बेळगाव : 14 कला आणि 64 विद्येचा देव, बुध्दीविधात्या गणेशाची तब्बल 1500 विद्यार्थ्यांनी महाआरती केली आणि या महाआरतीने चव्हाट गल्लीतील बेळगावच्या राजाचा श्री मंडपरूपी दरबार भक्तिमय आणि मंगलमय वातावरणाने दरवळून गेला.


[video width="848" height="478" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/08/VID-20250831-WA0174.mp4"][/video]

गणेशोत्सवाचे औचित्य साधून चव्हाट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री मंडपात बेळगावच्या राजांची महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला मराठा मंडळ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून बेळगावच्या राजाची विधीवत महाआरती केली. तब्बल 1500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसह शिक्षकवर्ग या महाआरतीला उपस्थित होते.


वाद्यांच्या गजरात मंगलमय वातावरणात महा आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ' गणपती बाप्पा मोरया ' चा जयघोष करून आसमंत दणाणून सोडला.
याप्रसंगी जीएसटी अधिकारी शिवा पाटील, मराठा मंडळं संस्थेचे संचालक रामचंद्र मोदगेकर, सकल मराठा समाजाचे समन्वयक गुणवंत पाटील, बेळगाव रुरल सोसायटीचे संचालक किसन रेडेकर, रमेश मोदगेकर, समाजसेवक आणि शिवसेना उबाठा गटाचे बेळगाव सीमाभाग उप शहर प्रमुख राजू तुडयेकर, अजिंक्य पाटील, बीएससी मॉलचे व्यवस्थापक अमजद जमादार, बीएससी मॉलचे पीआरओ इरण्णा उपस्थित होते.
विचारवंत गुणवंत पाटील यांनी यावेळी बोलताना गणपती विद्या आणि कलेचा अधिष्ठाता आहे. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाबरोबरच एखाद्यी कला अवगत करून घ्यायला हवी, असे म्हटले.
मनुष्याचा उद्देश चांगला असेल तर त्याला देवाचीही साथ लाभते. आपण आयुष्यात चांगलं माणूस बनण्याचे प्रयत्न करावेत आणि सेवाभावी वृत्तीने आणि निखळ मनाने लोकसेवा करून सामाजिक ऋण फेडावेत, असे बीएससीचे मॅनेजर अमजद जमादार यांनी यावेळी बोलताना म्हटले.
रामचंद्र मोदगेकर यांनी बोलताना, निलजी गाव व चव्हाट गल्लीचे ऋणाबंध खूप जुने असल्याचे सांगून चव्हाट गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.


या प्रसंगी प्रताप मोहिते, विश्वजित हसबे, उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनिल जाधव, विनायक पवार, निखिल गुंडकल, निशा कुडे, अभिषेक नाईक, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, भरत काळगे, अनंत बामणे, रोहन जाधव, सौरभ पवार, हर्षल नाईक, महिंद्र पवार, निखील पाटील, रोहन जाधव, संदीप कामुले, सौरभ बामणे, संजय रेडेकर, उमेश मेणसे यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती