LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अस्वलासह पिल्लांनी केला हल्ला : शेतकरी गंभीर जखमी

खानापूर ( bn7 news) : गुढीपाडव्यासाठी लागणारी कडुलिंब आणि आंब्याची पाने आणण्यासाठी शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलासह त्या अस्वलाच्या दोन पिल्लांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.


विलास चिकलकर ( वय 55, राहणार चिगुळे ) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बेळगाव जिल्ह्यातील कणकुंबी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिगुळे गावात ही घटना घडली आहे.


विलास चिकलकर हे गुढीपाडव्यासाठी लागणारी कडुलिंब आणि आंब्याची पाने आणण्यासाठी रानात गेले होते. यावेळी
एका मोठ्या अस्वलाने आणि त्यांच्या दोन पिल्लांनी त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलांनी त्यांच्या चेहऱ्याचा चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.

अस्वलाच्या हल्ल्याची माहिती मिळताच, कणकुंबी आरएफओ शिवकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णवाहिका बोलावली आणि जखमी व्यक्तीला बेळगावमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती