LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

12 एप्रिलला देसूर, उचगावमध्ये होणार डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण

बेळगाव ( bn7 news ) : देसुर येथे 12 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यानिमित्त शनिवार दि. 12 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.


देसूर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक कमिटी व दलित संघर्ष समिती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुतळा अनावरण सोहळा पार पाडण्यात येणार असून शनिवार दि. 12 ते सोमवार 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन मूर्तीची मिरवणूक व प्रतिष्ठापना सोहळ्यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आंबेडकरनगर वासियांच्यावतीने व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सौजन्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन मूर्तीची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
बेळगाव येथील राणी चन्नम्मा चौकाजवळील डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानापासून या मिरवणुकीला प्रारंभ होणार असून देसुर येथील डॉ. आंबेडकर भवन येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.



तरी सदर मिरवणुकीसह आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ग्रामपंच कमिटीसह गावकरी, युवक मंडळे व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शोभा वाढवावी, असे आवाहन डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक कमिटी व दलित संघर्ष समिती शाखा देसूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

 

उचगावमध्ये होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण :
बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 फूटी उंचीच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असून, आज बेळगाव शहरातून पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.


या मिरवणुकीचा प्रारंभ डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यान, बेळगाव येथून करण्यात आला. यावेळी बौद्ध वंदनेने पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीत विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. दलित नेते मल्लेश चौगुले, यादव कांबळे, यल्लप्पा कोलकार, सीपीआयचे धर्मण्णावर, पीएसआय परसण्णावर, सिद्धप्पा कांबळे, दीपक मेत्री, गडिनायक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


उचगाव येथे दिनांक 12 एप्रिल रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाणार आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती