LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

डॉ. अल्फिया बागवान यांचा ' जिल्हा युवती पुरस्कार ' देऊन केला गेला सन्मान

महाराष्ट्र : उल्लेखनीय सेवाभावी कार्याबद्दल कोल्हापूरच्या  डॉ. अल्फिया बागवान यांचा ' जिल्हा युवती पुरस्कार ' देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील डॉ. अल्फिया महंमद बागवान यांना, महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर विभागाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात मानाचा ' जिल्हा युवती पुरस्कार ' देऊन गौरवण्यात आले.

या दिमाखदार सोहळ्याला कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाअधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय,प्रफुल्लित केंद्राचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. अल्फिया बागवान यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये मोफत आरोग्य शिबिर, मोफत संगणक अभ्यासक्रम, महिला, मुली व विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व शिबिरांचे आयोजन, फिट कोल्हापूर मोहीम, मोफत महिला व मुलींसाठी योग प्रशिक्षण, 'हर घर तिरंगा' अंतर्गत झोपडपट्टीत ध्वजारोहण, वृक्षवंदन, स्वच्छता मोहीम, गरजूना अन्नदान, कपडे व खाऊ वाटप, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, मोफत कायदेशीर सल्ल्यासाठी मदत, मासिक पाळी मार्गदर्शन,भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती शपथ व मार्गदर्शन आनंददायी शनिवार उपक्रम, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन, पालक महिलांचा क्रीडा महोत्सव, महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना पुरस्कार,महिलांना आत्मनिर्भय व स्वावलंबी बनवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आयुष्मान व ई-श्रम सारख्या शासकीय सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी गरजूना मदत आदी सेवाकार्याचा समावेश आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. अल्फिया बागवान यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील, संचालिका रेश्मा काटकर, आई मिनाज बागवान,वडील महंमद बागवान तसेच प्रफुल्लित बाल विकास केंद्राच्या सर्व सदस्यांच्या दिले.


पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अल्फिया बागवान यांचे, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना उपशहरप्रमुख प्रदीप पाटील, मनसे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले, यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती