LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मर्यादा ओलांडू नका : सिद्ध, डिकेशिना हायकमांडने खडसावले

बेंगळुर : काँग्रेस हायकमांडने कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना चांगलेच खडसावले असून आपल्या मर्यादा ओलांडू नका अशा शब्दात त्यांना सुनावण्यात आले आहे.


पक्ष आणि सरकारवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी प्रशासनावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना हाय कमांडकडून देण्यात आल्या आहेत. पक्षाला कॅडर-बेस्ड यंत्रणेत रूपांतरित करण्याच्या दिशेने काँग्रेस वरिष्ठांनी निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत.


अहमदाबाद येथे दिनांक 8 आणि 9 एप्रिल रोजी होणाऱ्या एआयसीसी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही कानउघाडणी महत्त्वाची ठरली आहे. दिल्ली भेटीदरम्यान सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्याशी हायकमांडने चर्चा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीय आणि सहकारमंत्री के.एन. राजण्णा यांच्यावरील हनी ट्रॅपच्या आरोपावरून ही नाराजी उद्भवली आहे. सिद्धरामय्या यांनी हे प्रकरण प्रभावीपणे हाताळले नाही, त्यामुळे पक्ष आणि सरकारची प्रतिमा मलीन झाली, असे हायकमांडचे मत आहे.


राहुल गांधी यांनी भाजपच्या हातात कोणतीही संधी जाऊ नये, यासाठी सावध राहण्याचा सल्ला दिला. तसेच, निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच आश्वासनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही ते ठाम होते. राज्यातील चार महसूल विभागांमध्ये लाभार्थी मेळावे घेण्याचेही त्यांनी सुचवले.


राहुल गांधी यांनी दिल्लीतील बैठकीत सिद्धरामय्यांवर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. एआयसीसीचे सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणुगोपाल यांनी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना तातडीने आणि संवेदनशीलपणे प्रकरण हाताळण्याचे निर्देश दिले.


दरम्यान, एसटी महामंडळ घोटाळ्यातील आरोपांमुळे राजीनामा दिलेले माजी मंत्री बी. नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास राहुल गांधी यांनी विरोध दर्शवला.


शुक्रवारी सिद्धरामय्या यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. चार आमदारांच्या नामनिर्देशनाबाबत, तसेच केपीसीसी अध्यक्षपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. जिल्हा व तालुका पंचायतीसाठी निवडणुका होईपर्यंत डी.के. शिवकुमार यांनी अध्यक्षपद सांभाळावे, असे खर्गे यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षातील काही आमदार शिवकुमार यांच्या अध्यक्षपदाच्या विरोधात असून, यासंदर्भात सिद्धरामय्यांनी हायकमांडकडे तक्रार केली आहे.


हायकमांडने निर्णय घेतल्यास, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये सरकारचे अडीच वर्षे पूर्ण होताच, शिवकुमार राजीनामा द्यायला तयार असल्याचेही समजते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती