LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेला झाला आजपासून प्रारंभ

बेळगाव : टिळकवाडी येथील वॅक्सिन डेपो मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत आज सुरुवात झाली.
स्पर्धा उद्घाटनच्या दिवशी बेळगाव शहर, बैलहोंगल रामदुर्ग, बेळगाव ग्रामीण या संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.



स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण ,नगरसेवक नितीन जाधव, राजू भातकांडे, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, बेळगांव तालुका पीईओ साधना बद्री, खानापूर तालुका पीईओ सुरेखा मिरजी जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर वंटगुडी, हॉकी बेळगावचे हॉकी बेळगावचे सचिव सुधाकर चाळके विवेक पाटील टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्षा सिल्वीया डिलीमा, रमेश सिंगद,स्पर्धा अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर स्पर्धा सचिव चंद्रकांत पाटील सहसचिव बापूसाहेब देसाई उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व परिचय चंद्रकांत पाटील यांनी केले यानंतर पाहुण्यांचे हस्ते भारतमाता फोटोपूजन, मैदान पूजन, यष्टीपूजन व क्रिकेट खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, प्रवीण पाटील, संतोष दळवी, देवेंद्र कुडची, सचिन कुडची, अर्जुन भेकने किरण तरळेकर ,अनिल जनगौडा, शिवकुमार सुतार, दत्ता पाटील,सुभाष गंभीर आय एम पटेल रमेश अलगुडेकर, अल्लाबक्ष बेपारी प्रकाश बजंत्री, विविध तालुक्यातील संघ उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती