LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बौद्ध भिक्षूच्या खुनाचे धागेदोरे उलघडले : धारवाड पोलिसांनी आवळल्या त्रिकुटाच्या मुसक्या

धारवाड : धारवाड येथील बौद्ध भिक्षूच्या खुनाचे धागेदोरे उलघडण्यात धारवाड ग्रामीण पोलिसांना यश आले असून या प्रकरणी पोलिसांनी त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संकेत यादव (वय 24), वैभव चव्हाण ( वय 30) आणि सिद्धेश भोसले (वय 18) अशी पोलिसांनी खून प्रकरणी अटक केलेल्या त्रिकुटाची नावे आहेत.


तिबेटी मूळ असलेले बौद्ध भिक्षू ताशी धोंडुप (वय अंदाजे 40) यांचा मृतदेह एप्रिल अखेरीस धारवाड बायपासवरील हल्याळ रोडजवळ आढळून आला होता. सुरुवातीला अपघाती मृत्यूचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र चेहऱ्यावर जखमा आढळल्याने यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि या खून प्रकरणी त्रिकुटाला चतुर्भुज केले.


पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींना खाक्या दाखविला असता त्यांनी केलेल्या कारनाम्याची माहिती दिली.
भिक्षूकडे मोठी रक्कम असल्याचा संशय घेत आरोपींनी बौद्ध भिक्षुचे अपहरण केले. त्यांना कारमध्ये ठेवून पैशांची मागणी करण्यात आली. मात्र पैसे नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. घाबरलेल्या आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावून खून पचवण्यासाठी मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेऊन फेकून दिला आणि ते काहीकाळासाठी भूमिगत झाले.


या प्रकरणात सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि हळूहळू या खुनाचे धागेदोरे उलघडू लागले. पेट्रोल पंपावरील फुटेजमुळे तपासाला दिशा मिळाली आणि पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
पोलिसांनी विशेष पथके तयार करून काही दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती