LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

देवरदासीमय्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी : मिरवणुकीत विणकर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी

बेळगाव ( bn7 news) : वडगाव येथे विणकर समाजाच्यावतीने आद्य गुरू श्री देवरदासीमय्या यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक आकर्षक ठरली.


आद्य गुरु श्री देवरदासीमय्या जयंतीचे औचित्य साधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. धनगरी वाद्याच्या गजरात आणि देवरदासीमय्या यांचा जयघोष करीत संत बसवेश्वर सर्कल खासबाग येथून मिरवणुकीला सुरुवात झाली.
सिंह-वाघ आणि मोटू-पतलूसह अन्य मुखवटे परिधान करून कलाकार मिरवणुकीत सहभागी झाले होते. मोटू पतलू चे मुखवटे धारण केलेले कलाकार विशेषता बालकांचे मनोरंजन करणारे ठरत होते. आद्य गुरु श्री देवरदासीमय्या यांचे भावचित्र असणारे ध्वज घेऊन विणकर समाज बांधव मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोईवर पवित्र कलश घेऊन विणकर समाजातील भगिनीही मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीच्या शेवटी रथात आद्य गुरु श्री देवरदासीमय्या यांचा सजिव देखावा सादर करण्यात आला होता.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि विणकर समाजातील नेते मिरवणुकीच्या अग्रभागी होते.


श्री बनशंकरी मंदिर आवारात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यानंतर मंदिराच्या भव्य सभागृहात समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गजानन गुंजेरी यांनी, समारंभात प्रास्ताविक भाषण केले. यानंतर गुळेदगुड्ड पट्टसाली गुरुमठाचे परमपूज्य श्री बसवराज पट्टदार्य महास्वामी यांनी मार्गदर्शन केले. अभय पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात, बेळगाव शहरातील एका प्रमुख रस्त्याला देवरदासीमय्या यांचे नाव देण्यात येईल, तसेच विणकर संत चौकाची उभारणी केली अशी ग्वाही दिली. इतकेच नाही तर, विणकर समाजातील व्यक्तीला बेळगावचा महापौर बनवण्याचे आश्वासनही अभय पाटील यांनी दिले.
विणकर बांधव मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती