LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' डान्सिंग प्ले ' चा अपघात : 18 जखमी, 4 जण गंभीर : यात्रेत घडली घटना

गदग : ' डान्सिंग प्ले ' चा खेळ खेळताना दोन बोग्या सरकल्या आणि झालेल्या अपघातात 18 जण जखमी झाले. यातील दोघेजण गंभीर आहेत. गदग येथील तोन्टदार्य मठाच्या परिसरात भरलेल्या यात्रेत रविवारी रात्री 9 च्या दरम्यान ही घटना घडली आहे.
यात्रेत काही जण आकाश पाळणा खेळत होते. काही लोक डान्सिंग प्ले चा खेळ खेळत होते. यावेळी डान्सिंग प्ले च्या दोन बोग्या वर उचलल्या गेल्या आणि या अपघातात अठरा जण जखमी झाले. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.


जखमींना गदग वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघे कोप्पळ जिल्ह्यातील, एक तुमकूर जिल्ह्यातील तर उर्वरित गदग जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.


या घटनेला जबाबदार असलेल्या मनोरंजन खेळांसाठी टेंडर घेतलेल्या ठेकेदारावर आणि जत्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू वीरशैव लिंगायत युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या जत्रा समिती आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. अन्यथा गदग बंदची हाक दिली जाईल, असा इशारा मंचचे राज्य संयोजक राजू खानप्पनवर यांनी दिला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती