LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दरात पुन्हा वाढ : हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व्यावसायिकांना बसणार फटका

बेंगळूर  : व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून ही दरवाढ आजपासून लागू करण्यात येत आहे. या दरवाढीचा फटका हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यापाऱ्यांना बसणार आहे. या वाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.


व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दरवाढ ही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिकांना थेट आर्थिक परिणाम करणारी असल्याने व्यावसायिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. आधीच जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत त्यात सिलेंडर दरवाढ म्हणजे जणू दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागणार आहे.
इराण-इस्रायल युद्धानंतर भारतात एलपीजी सिलिंडर मिळणे कठीण झाले असून, परिस्थिती अजूनही तशीच आहे. दरम्यान, 1 मे पासून लागू होणाऱ्या व्यावसायिक एलपीजीच्या निर्बंधांमुळे सर्वसामान्यांवर आणखी एक भार पडला आहे.
1 मे पासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
ऊर्जा कंपन्यांच्या मते, ही दरवाढ अलीकडील जागतिक तेल आणि वायू बाजारातील अस्थिरता, पुरवठा साखळी खर्चातील वाढ आणि विनिमय दरांच्या परिणामामुळे होत आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी, 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी अनुदान आणि नियामक प्रणालीमुळे घरगुती गॅसचे दर स्थिर राहिले आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती