LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

साखळी अपघातात बीएसएफ जवान आणि अम्ब्युलन्स चालक ठार !

विजापूर : भरधाव वेग आणि निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने झालेल्या साखळी अपघातात बीएसएफ जवानासह दोघांचा मृत्यू झाला. मौनेश खुबप्पा राठोड (वय 35 ) असे अपघातात मरण पावलेल्या जवानाचे नाव आहे. नीडगुंडी शहराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर हा साखळी अपघात घडला.


मुधेबिहाळ तालुक्यातील कालगी टांडा येथील रहिवासी असणारे मौनेश राठोड हे कालगी टांडाहून नीडगुंडीमार्गे बागलकोट जिल्ह्यातील आलूर टांडा येथे पत्नीला भेटण्यासाठी दुचाकी वरून जात होते. पत्नीला भेटून त्यानंतर ते परत सेनेत दाखल होणार होते. मात्र नीडगुंडी बसस्थानकाजवळ गुजरातहून बंगळुरकडे निघालेल्या एका ट्रकची त्यांच्या बाइकला धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्याच ट्रकने पुढे जाऊन एका बसला देखील धडक दिली, मात्र सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. उत्तरप्रदेशमधील एका ॲम्ब्युलन्सलाही ट्रकने जोरदार धडक दिली असून, त्या ॲम्ब्युलन्सचा चालक ऋतीशकुमार कोडा यांचा मृत्यू झाला आहे.
ट्रक चालकाच्या निष्काळजीपणा मुळे हे अपघात होऊन बीएसएफ जवान आणि ॲम्ब्युलन्सचा चालकाला जीव गमवावा लागला.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती