LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

त्या दोघांचा मृत्यू : होतेय हळहळ व्यक्त

बेळगाव : सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.
बेळगाव तालुक्यातील सुळगा हिंडलगा येथील शंकर गल्लीतील येथे शनिवार दिनांक 18 मे रोजी ही घटना घडली होती.



या घटनेत कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय 65) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील ( वय 61) हे गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या या दाम्पत्याला उपचारासाठी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना खाजगी इस्पितळात हलविण्यात आले होते. सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. सहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या दाम्पत्याचा शुक्रवारी 24 रोजी मृत्यू झाला.
रात्री रेग्युलेटर मधून गॅस गळती होऊन घरात गॅस पसरला होता. झोपेत या दाम्पत्याला हे कळलेच नाही. पहाटे उठून स्वयंपाक घरातील दिवा लावण्यासाठी बटन दाबताच आगीचा भडका उडाला आणि ती दुर्घटना घडली होती.


 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

आवळल्या' छोटू' च्या मुसक्या


हुबळी : रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए ने हुबळीतील रहिवासी शोएब अहमद मिर्झा उर्फ छोटू याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता पाच वर पोहोचलेली आहे.
शोएब उर्फ छोटू हा 35 वर्षीय तरुण लष्कर-ये-तोयबा संघटनेने 2012 मध्ये घडवलेल्या घातपाताच्या कटात सहभागी होता. याप्रकरणी शिक्षा भोगून तो कारागृहातून मुक्त झाला आहे. आता त्याचा बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असल्याने त्याला अटक करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती