LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शरीरसौष्ठवपटू गजानन गावडे याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनने केला सत्कार

बेळगाव : उद्यमबाग येथील कारखान्यात काम करणाऱ्या गजानन गावडे या कामगाराने जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट शरीरयष्टीचे दर्शन घडवीत सुवर्णपदक पटकाविले. बिकट आर्थिक परिस्थिती असूनही त्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभाळत व्यायाम करून शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याने, त्याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनच्यावतीने सन्मान करण्यात आला.



बेळगांव मायक्रो असोसिएशन उद्यमबागचे अध्यक्ष रमेश देसुरकर यांनी मायक्रो असोसिएशनतर्फे शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गजानन गावडे याला सन्मानित केले आणि शुभेच्छा दिल्या.
गजानन गावडे याला तो काम करीत असलेल्या कारखान्याचे मालक सदानंद शिनोळकर यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत आहे.
सत्कार समारंभावेळी प्रशिक्षक विकास शहापूरकर, मॅनेजर निलेश रजाईकर, मायक्रो असोसिएशनचे सदस्य राजू वरपे आणि कामगार उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती