LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भाजपचा यात्रेद्वारे जनआक्रोश : काँग्रेस सरकारवर ओढला शाब्दिक आसूड

बेळगाव ( bn7 news) : जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, मुस्लिम तुष्टीकरण व मागासवर्गीय निधीचा अपहार या विरोधात भाजपने आज जनआक्रोश यात्रा काढली. यावेळी भाजपने काँग्रेस सरकारवर शाब्दिक आसूड ओढला. काँग्रेस सरकारला लक्ष्य करत भाजपने राज्यातील काँग्रेस सरकार कुचकामी ठरल्याचे म्हटले.


पहिल्या टप्प्यातील यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर भाजपने आज बुधवारी दुसऱ्या टप्प्यात जनआक्रोश यात्रा काढली. पक्षाचे नेते मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते.


गोवावेस येथील बसवेश्वर चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरून यात्रेला प्रारंभ झाला. शहापूरमधील नाथ पै चौक मार्गे ही यात्रा शिवाजी उद्यानात पोहोचली.
जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रखर उन्हातही उत्साहाने यात्रेत सहभाग नोंदवला.



काँग्रेस सरकारने 50 हून अधिक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून गरिब व मध्यमवर्गीय जनतेवर अन्याय केला आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.


या यात्रेत भाजपचे राज्याध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, खासदार जगदीश शेट्टर, गोविंद कारजोळ, आमदार अभय पाटील, भालचंद्र जारकीहोळी, निखिल कट्टी, दुर्योधन ऐहोळे, नेते बी. श्रीरामूलू, माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, पी. राजीव यासह अन्य नेते आणि बहुसंख्य कार्यकार्ये आदी सहभागी झाले होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती