बेळगाव : टिळकवाडी येथील लायन्स भवन येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने संकल्पपूर्ती सभा आयोजिण्यात आली होती.
भाजप दक्षिणचे प्रभारी महादेव दरेणावर, सचिन कणबर्गी, नगरसेवक नंदु मिरजकर, वार्ड क्रमांक 44 चे नगरसेवक आनंदराव चव्हाण याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी आनंदराव चव्हाण, नंदु मिरजकर व महादेव दरेणावर यांनी भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या नवनवीन योजनांची माहिती दिली. महापालिका प्रभाग स्वच्छता विभागाचे सुपर वाईजर आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांचा उत्कृष्ट रक्तदाते म्हणून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राहुल कांबळे, मंदार उचगांवकर. वासुदेव कुलकर्णी, वसंत हेब्बाळकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
[video width="540" height="810" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/07/VID-20250721-WA0218.mp4"][/video]