बेळगाव : बेळगाव-चंदगड विभाग व श्री दुर्गसेवा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेंतर्गत दुर्गवीरांनी मुख्य प्रवेशद्वार, बुरुज आणि तटबंदी वरील अतिप्रमाणात वाढलेली झाडेंझुडूपे काढून टाकली. यावेळी हाणेंस आणि रोप वापरून तटबंदीवरील धोकादायक झुडूपे काढून गडाची स्वच्छता करण्यात आली.
आगामी मोहिमेत गडाची संपूर्ण तटबंदी स्वच्छ करण्यात येणार असून बेळगाव-चंदगड मधील शिवभक्तांनी त्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन चंदगड विभाग व श्री दुर्गसेवा बेळगाव यांच्यावतीने यावेळी करण्यात आले.