LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेनकनहळ्ळी प्राथमिक शाळेला आदर्श एसडीएमसी पुरस्काराने केले गेले सन्मानीत

बेळगाव : बेनकनहळ्ळी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला बेळगाव तालुक्यातील आदर्श एसडीएमसी पुरस्कार देऊन सन्मानीतत करण्यात आले.
गांधी भवन येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्तीमठाचे शिवानंद स्वामीजी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ तसेच डाएट प्राचार्य बसवराज नलतवाड, क्षेत्र शिक्षणाधिकारी बेळगाव ग्रामीणचे एस.पी. दासप्पणावर, बीआरसी प्रमुख एम. एस. मेदार तसेच इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते, .


यावेळी तालुक्यातील वर्षभरामध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. ' यानंतर तालुक्यातील निवडक शाळांना आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर बेनकनहळ्ळी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला आदर्श एसडीएमसी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.


हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी एसडीएमसी अध्यक्ष कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष वैजनाथ मोनापा पाटील तसेच इतर सर्व एसडीएमसी सदस्य, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष परशराम पिसाळे, उपाध्यक्ष गजानन पाटील, सचिव यल्लाप्पा देसुरकर, खजिनदार मोहन कांबळे तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
शाळेचा शिक्षक वर्ग, मुख्याध्यापिका एस. एम. मलकापूर, एच. के. बाळेकुंद्रीकर, एम. बी. बागवान, संभाजी पाटील, एम. एन. पाटील तसेच ईश्वर पाटील हेही यावेळी उपस्थित होते.


या शाळेच्या यशात तसेच विद्यार्थांच्या जडण घडणीत शाळेचे विज्ञान शिक्षक तसेच उपक्रमशील आणि कार्यतत्पर शिक्षक ईश्वर सातेरी पाटील (बेळवटी) यांच्या सेवा कार्याचा मोलाचा वाटा आणि एसडीएमसी व शिक्षकवर्गाचे प्रोत्साहन यामुळेच हा पुरस्कार शाळेला मिळाल्याचे कौतुकास्पद उदगार शाळेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांतून काढले जात आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती